Amol Kolhe : देवेंद्र दरबारी, मंत्री रम्मी खेळती भारी… अमोल कोल्हेंचा कृषीमंत्र्यांच्या ‘त्या’ कृतीवरून संताप

Amol Kolhe : देवेंद्र दरबारी, मंत्री रम्मी खेळती भारी… अमोल कोल्हेंचा कृषीमंत्र्यांच्या ‘त्या’ कृतीवरून संताप

| Updated on: Jul 20, 2025 | 1:49 PM

रोहित पवारांनी आज सकाळी एक ट्वीट करून राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली. राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात माणिकराव कोकाटे हे रमी खेळत असल्याचा दावा रोहित पवार यांनी केला.

देवेंद्र दरबारी… मंत्री रम्मी खेळती भारी! असं म्हणत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते आणि खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी कृषीमंत्री माणिकराव कोकोटे यांच्या कृतीवरून संताप व्यक्त केलाय. अमोल कोल्हे यांनी ट्वीट करत असे म्हटले की, ‘रोज ८-१० शेतकरी आपले आयुष्य संपत आहेत, सरकारने दिलेले कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण होण्यासाठी, सातबारा कोरा होण्यासाठी शेतकरी मोठ्या आशेने वाट पाहत आहेत. पण कृषिमंत्री मात्र विधिमंडळात ऑनलाईन पत्त्यांचा डाव मांडून बसलेत’, असं म्हणत अमोल कोल्हे यांनी हे महाराष्ट्राचं दुर्देव असल्याची भावना ट्वीटद्वारे व्यक्त केली आहे.

अधिवेशनात सभागृहाचे कामकाज सुरू असताना कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे चक्क रमी खेळत असल्याचा आरोप शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केला. ट्वीट करत रोहित पवार म्हणाले, राज्यात रोज ८ शेतकरी आत्महत्या करत असताना सुद्धा काही कामच नसल्याने कृषिमंत्र्यांवर रमी खेळण्याची वेळ येत असावी, असा खोचक टोलाही त्यांनी लगावला.

Published on: Jul 20, 2025 01:48 PM