Sangli Protest : आष्टामध्ये पवारांच्या राष्ट्रवादीचा स्ट्राँग रूमबाहेर ठिय्या; संतप्त कार्यकर्त्यांची मागणी काय?

Sangli Protest : आष्टामध्ये पवारांच्या राष्ट्रवादीचा स्ट्राँग रूमबाहेर ठिय्या; संतप्त कार्यकर्त्यांची मागणी काय?

| Updated on: Dec 03, 2025 | 4:24 PM

सांगली जिल्ह्यातील आष्टामध्ये शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांनी स्ट्राँग रूम सुरक्षेवरून तीव्र आंदोलन केले आहे. मतदानाची टक्केवारी वाढल्याचा आणि सीसीटीव्ही बंद असल्याचा आरोप करत कार्यकर्त्यांनी पारदर्शकतेची मागणी केली.

सांगली जिल्ह्यातील आष्टामध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मतदान केंद्रांवरच्या स्ट्राँग रूममधील सुरक्षेवरून तीव्र आंदोलन सुरू केले आहे. कार्यकर्त्यांनी स्ट्राँग रूममध्ये आवश्यक सुरक्षा यंत्रणा नसल्याचा, तसेच सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याचा आरोप केला आहे. मतदानाची टक्केवारी अचानक वाढल्याने संशय निर्माण झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे. या प्रकरणी प्रशासनाकडून योग्य प्रतिसाद न मिळाल्याने कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.

माजी उपनगराध्यक्ष धैरेशील शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू असून, त्यांनी पोलिसांशी संवाद साधत आपल्या मागण्या मांडल्या आहेत. कार्यकर्त्यांची प्रमुख मागणी आहे की स्ट्राँग रूममध्ये काय चालले आहे, हे पाहण्यासाठी बाहेर एलसीडी स्क्रीन लावावी आणि बंद असलेले सीसीटीव्ही तत्काळ सुरू करावेत. जोपर्यंत त्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे. पोलीस आणि तहसीलदार आंदोलकांशी चर्चा करून तोडगा काढण्याचा प्रयत्न करत आहेत.

Published on: Dec 03, 2025 04:24 PM