Sanjay Raut | शरद पवारांच्या उमेदवारीने राष्ट्रपतीपदाची निवडणूक रंगतदार झाली असती : संजय राऊत
पवारांनी राष्ट्रपती पदाच्या निवडणूकीसाठी नाही म्हणल्यावर देशात कुणी इतर तगडा उमेदवार उरलाय का? असा सवाल शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे.
मुंबईः शरद पवार यांनी राष्ट्रपती पदाची निवडणूक (Presidential Election) लढवण्यासाठी नकार दिल्यानंतर निवडणुकीतली हवाच निघून गेली आहे. राष्ट्रपती पदाच्या निवडणूकीची तयारी ही किमान सहा महिने आधी करायला हवी होती. परवा ममता बॅनर्जी यांनी दिल्लीत एक बैठक घेतली ज्याला पक्षांचे जवळ जवळ सर्वच आघाडीचे नेते उपस्थित होते. याबैठकीत शरद पवारांच्या नावाला अग्रह होता. पण, अजूनही पवार साहेब ही निवडणूक लढायला तयार नाही आहेत. त्यामुळे पवार साहेबांनी नाही म्हटल्यावरती विरोधी पक्षाच्या आघाडीत मज्जा तिथेच निघून गेली. पवारांनी नाही म्हणल्यावर देशात कुणी इतर तगडा उमेदवार उरलाय का? असा सवाल शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे. देशात आतापर्यंत मोजकेच राष्ट्रपती चांगले मिळाले. यात प्रणवदा, अब्दुल कलाम यांची नावं आहेत. अन्यथा नेहमीच सत्ताधारी पक्षानी आपल्या मर्जीतील नेत्याला राष्ट्रपती पदावर निवडून दिले आहे. यंदा तरी शरद पवार (Sharad Pawar) या निवडणुकीसाठी उभे राहिले असते निवडणुकीत तर रंगत आली असती, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं.
