Shashikant Shinde : शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदाची धुरा शशिकांत शिंदेंवर

Shashikant Shinde : शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदाची धुरा शशिकांत शिंदेंवर

| Updated on: Jul 15, 2025 | 4:33 PM

टीव्ही9 मराठीच्या बातमीवर शिक्कामोर्तब झालेलं असून शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदे हे नवे प्रदेशाध्यक्ष झाले आहेत.

अक्षय मंकणी, प्रतिनिधी

शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदे हे नवे प्रदेशाध्यक्ष झाले आहेत. टीव्ही9 मराठीच्या बातमीवर आता शिक्कामोर्तब झालेला आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून शशिकांत शिंदे यांची निवड करण्यात आलेली आहे. आज झालेल्या पक्षाच्या बैठकीत शशिकांत शिंदे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.

माजी मंत्री आणि आमदार जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर नवीन प्रदेशाध्यक्ष कोण असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आता शरद पवार यांनी स्वतः शशिकांत शिंदे यांच्या नावाची घोषणा करत त्यांची पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड केली आहे. शशिकांत शिंदे यांच्या नियुक्तीनंतर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षाला यश मिळवून देण्याची महत्त्वाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे.

Published on: Jul 15, 2025 04:33 PM