आदित्य ठाकरे यांच्या अडचणी वाढणार? दिशा सालियान प्रकरणी होणार SIT चौकशी?

आदित्य ठाकरे यांच्या अडचणी वाढणार? दिशा सालियान प्रकरणी होणार SIT चौकशी?

| Updated on: Dec 07, 2023 | 1:09 PM

गेल्या वर्षी झालेल्या हिवाळी अधिवेशनात राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरे यांच्या SIT चौकशीचे आदेश दिले होते. दरम्यान, यंदाच्या हिवाळी अधिवेशनातही हा मुद्दा गाजत असल्याचे पाहायला मिळत आहे

मुंबई, ७ डिसेंबर २०२३ : आदित्य ठाकरे यांच्या अडचणी वाढवणारी बातमी समोर येत आहे. दिशा सालियान मृत्यू प्रकरणी शिंदे सरकार आदित्य ठाकरे यांची SIT चौकशी करणार असल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे. इतकेच नाहीतर अतिरिक्त पोलिस आयुक्तांच्या नेतृत्वात हे SIT पथक हे काम करणार असल्याचेही सांगितले जात आहे. गेल्या वर्षी झालेल्या हिवाळी अधिवेशनात राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरे यांच्या SIT चौकशीचे आदेश दिले होते. दरम्यान, यंदाच्या हिवाळी अधिवेशनातही हा मुद्दा गाजत असल्याचे पाहायला मिळाले त्यामुळे आता आदित्य ठाकरे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता देखील वर्तविली जात आहे. दरम्यान, विरोधकांनी दिशा सालियान मृत्यू प्रकरणी आवाज उठवत आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केल्याचेही पाहायला मिळाले. नुसते आरोपच नाहीतर त्यांची एसआयटी चौकशी करण्यात यावी अशीही मागणी केली होती. त्यामुळे आता या SIT चौकशीत अनेक पुरावे समोर येणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.

Published on: Dec 07, 2023 01:09 PM