Duplicate Voter Scandal: दुबार मतदार अन् नाशकात नवं वॉर… मनसेला शिंदेंच्या सेनेची साथ? ‘त्या’ आकडेवारीनं भाजपसमोर पेच
नाशिकमध्ये तब्बल २ लाख ९८ हजार ८५३ दुबार मतदार असल्याचा खळबळजनक दावा शिंदे गटानं केला आहे. सत्ताधारी मित्रपक्षाकडूनच हे गंभीर आरोप झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. निवडणूक आयोगाने वारंवार तक्रारी देऊनही कारवाई केली नाही, असा ठपकाही शिंदे गटानं ठेवला असून, या प्रकरणी तातडीने चौकशीची मागणी केली आहे.
नाशिकमध्ये दुबार मतदारांच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापले आहे. एकीकडे भाजपवर याच आरोपांवरून मनसे आणि महाविकास आघाडीने मोर्चा काढला असताना, आता भाजपचाच सत्ताधारी मित्रपक्ष असलेल्या शिंदे गटानं नाशिकमधील दुबार मतदारांवर गंभीर आरोप केले आहेत.
नाशकात सुमारे २ लाख ९८ हजार ८५३ दुबार मतदार असल्याचा दावा शिंदे गटानं केला आहे. शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या छाननीनुसार, नाशिक पश्चिम, मध्य, पूर्व आणि देवळाली या विधानसभा मतदारसंघांमध्ये मोठ्या प्रमाणावर दुबार मतदार आढळून आले आहेत. यात भाजपच्या आमदारांच्या मतदारसंघांचाही समावेश आहे.
निवडणूक आयोगाने वारंवार तक्रारी करूनही कारवाई न केल्याचा आरोप शिंदे गटानं केला आहे. मतदारांची संख्या लोकसंख्येच्या तुलनेत वाढल्याने आणि बीएलओंकडून पडताळणी झाली नसल्याचे प्रश्नही उपस्थित केले आहेत
Published on: Nov 03, 2025 11:36 AM
