Shivsena Tweet : एक प्रगल्भ, दूसरा वेडापिसा..; शिंदेसेनेची ठाकरे बंधूंवर टीका

Shivsena Tweet : एक प्रगल्भ, दूसरा वेडापिसा..; शिंदेसेनेची ठाकरे बंधूंवर टीका

| Updated on: Jul 05, 2025 | 4:36 PM

Shinde Sena Slams Thackeray Brothers : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर टीका करण्यात आली आहे.

एक मराठी प्रेमी, दूसरा खुर्ची प्रेमी अशी टीका शिंदेंच्या सिवसेनेकडून ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर करण्यात आली आहे. एक मराठीचा पुरस्कर्ता तर दूसरा तिरस्कर्ता असं ट्विट शिवसेनेकडून करण्यात आलं आहे. एक प्रगल्भ तर दूसरा वेडापिसा, असंही या ट्विटमध्ये शिवसेनेने म्हंटलं आहे.

हिंदी सक्तीचा जीआर रद्द झाल्यानंतर ठाकरे बंधूंनी एकत्र येत आज विजयी मेळावा घेतला. या मेळाव्यात तब्बल 19 ते 20 वर्षांनी ठाकरे बंधु एकत्र दिसून आले. त्यामुळे मराठी माणसाचं अनेक वर्षाचं स्वप्न पूर्ण झालं आहे. तर या मेळाव्यावर आता शिंदेंच्या ठाकरे गटाकडून टीका करण्यात आली आहे. या ट्विटमध्ये म्हंटलं आहे की, एल प्रबोधक, एक प्रक्षोभक, एक उजवा, दूसरा डावा, एक धाकला असून थोरला, दूसरा थोरला असून धाकला, एक मराठी प्रेमी, एक खुर्ची प्रेमी, एकच्या मुखी आसूड, दुसऱ्याच्या तोंडी सूड! अशा आशयाचं ट्विट करून ठाकरेंवर टीका करण्यात आली आहे.

Published on: Jul 05, 2025 04:36 PM