‘आ रहा है गब्बर’ म्हणत गुलाबराव पाटील यांची संजय राऊत यांच्यावर सडकून टीका

‘आ रहा है गब्बर’ म्हणत गुलाबराव पाटील यांची संजय राऊत यांच्यावर सडकून टीका

| Updated on: Jun 06, 2023 | 4:14 PM

VIDEO | गुलाबराव पाटील यांचा संजय राऊत यांच्यावर घणाघात, बघा काय केली टीका

जळगाव : शिवसेना नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर घणाघाती टीका केल्याचे पाहायला मिळाले. संजय राऊत यांच्यावर टीका करताना गुलाबराव पाटील यांनी संजय राऊत यांचा बापच काढला आहे. आ रहा है गब्बर, संजय राऊत यांना फक्त मी एकटा दिसतोय. म्हणून ते थुंकायला लागला. इतक्या खालच्या पातळीचं राजकारण मी कधी पाहिलं नव्हतं असं म्हणत या आधी कोणतेहीच राजकीय पक्ष फुटले नाहीत का? असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय. तर शिंदे गटातील त्या ४० आमदारांना संपवून टाकू असे म्हणताय, त्याच ४० लोकांनीच मतं दिली म्हणून तुम्ही खासदार झालेत असं म्हणत त्यांनी पुन्हा एकदा राजीनाम्याची मागणी केली. मला मतं माझ्या गावकऱ्यांनी दिली. १० हजार २०० मतं मला मिळाली, यामध्ये सर्व धर्माची होती. संजय राऊत यांना पाहून मला ही मतं नाही मिळाली. जर इथे त्यांनी माझ्यासाठी सभा घेतली असती तर तेवढी मतं पण मला मिळाली नसते, असे म्हणत हल्लाबोल केला.

Published on: Jun 06, 2023 04:12 PM