Yashwant Jadhav यांच्याकडून ‘मातोश्री’ला 2 कोटी? जाधव म्हणतात, ती तर माझी आई!

Yashwant Jadhav यांच्याकडून ‘मातोश्री’ला 2 कोटी? जाधव म्हणतात, ती तर माझी आई!

| Edited By: | Updated on: Mar 27, 2022 | 11:31 AM

आयकर विभागाने टाकलेल्या छाप्यात एक डायरी मिळाली असून, यातून यशवंत जाधव यांच्या व्यवहाराची पोलखोल झालीय. त्यात निवासी इमारतीतील भाडेकरू हक्क संपादन करण्यासाठी सुमारे 10 कोटी रोख दिले. गुढीपाडव्याला ‘मातोश्री’ला 2 कोटींचे पेमेंट केले. ‘मातोश्री’ला 50 लाखांचे घड्याळ पाठवले, अशा नोंदी आहेत.

मुंबईः शिवसेना (Shivsena) नेते, मावळत्या मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष आणि महापौर पदाचा भावी चेहरा म्हणून पाहिले जाणारे यशवंत जाधव (Yashwant Jadhav) यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसतेय. आयकर विभागाने टाकलेल्या छाप्यात त्यांना एक डायरी मिळाली असून, यातून त्यांच्या व्यवहाराची पोलखोल झालीय. त्यात निवासी इमारतीतील भाडेकरू हक्क संपादन करण्यासाठी सुमारे 10 कोटी रोख दिले. गुढीपाडव्याला ‘मातोश्री’ला 2 कोटींचे पेमेंट केले. ‘मातोश्री’ला 50 लाखांचे घड्याळ पाठवले, अशा नोंदी आहेत. याबाबत आयकर विभागाने जाधवांकडे चौकशी केली. मात्र, त्यांनी चलाखीने या विषयाला बगल देत डायरीतील ‘मातोश्री’ हा उल्लेख म्हणजे आपली आई असल्याचे म्हटले आहे. आपल्याला दानाची 2 कोटी रुपयांची रक्कम मिळाली. याचा वापर मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या भेटवस्तू देण्यासाठी केला. माझ्या आईच्या नावावर लोकांना घड्याळांचे वाटप केल्याचा दावा त्यांनी केला, पण दुसरीकडे मुख्यमंत्री आणि शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या घराचे नावही ‘मातोश्री’ आहे. त्यामुळे या उत्तरावर आयकर विभागाचे समाधान झाले नसल्याचे समजते.

Published on: Mar 27, 2022 11:31 AM