Gulabrao Patil : नारायण राणे कोंबडी विकायचे, आपलं लव्ह मॅरेज त्यांच्याशी… गुलाबराव पाटलांच्या मिश्कील वक्तव्याची चर्चा
मंत्री गुलाबराव पाटील यांनी नारायण राणे यांच्या पूर्वायुष्यावर वक्तव्य करत बाळासाहेब ठाकरे यांनी अनेकांना मोठे केल्याचे म्हटले. नगरविकास खाते आपल्याकडे असल्याने त्यात माल असल्याचेही ते म्हणाले.
महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात विविध मुद्द्यांवरून चर्चांना तोंड फुटले आहे. मंत्री गुलाबराव पाटील यांच्या एका वक्तव्याने सर्वाधिक लक्ष वेधले आहे. जळगावात बोलताना मंत्री गुलाबराव पाटील यांनी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या पूर्वायुष्यावर भाष्य केले. “राणे कोंबडी विकायचे, बाळासाहेबांनी अनेकांना मोठं केलं,” असे वक्तव्य त्यांनी केले. यावेळी मंत्री गुलाबराव पाटील यांनी छगन भुजबळ हे भाजी विकायचे आणि बुलढाण्याचे विजयराज शिंदे हे पुंगाणी वाजवणारे गुरव होते, अशी उदाहरणे देत, बाळासाहेब ठाकरे यांनी अनेक सामान्य लोकांना मोठे केले हे अधोरेखित केले. नगरविकास खाते आपल्याकडे असल्याने त्यात माल असल्याचेही गुलाबराव पाटील यांनी म्हटले, ज्यामुळे त्यांच्या वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.
Published on: Nov 26, 2025 12:03 PM
