Uday Samant :  शिंदेंच्या बॅगेत नेमकं काय? कॅश की… शिंदे सेनेनं खरंच पैसे वाटले? ‘त्या’ नेत्याच्या आरोपांवर बड्या मंत्र्याचं थेट उत्तर

Uday Samant : शिंदेंच्या बॅगेत नेमकं काय? कॅश की… शिंदे सेनेनं खरंच पैसे वाटले? ‘त्या’ नेत्याच्या आरोपांवर बड्या मंत्र्याचं थेट उत्तर

| Updated on: Dec 02, 2025 | 4:03 PM

उदय सामंत यांनी वैभव नाईक यांच्या एकनाथ शिंदे यांच्यावरील आरोपांना प्रत्युत्तर दिले. शिंदे यांनी महाराष्ट्रात सर्वाधिक ५३ सभा घेतल्याचे नमूद करत, नाईकांनी केलेले आरोप निराशेपोटी आणि राजकीय अपरिपक्वतेचे लक्षण असल्याचे सामंत यांनी म्हटले.

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी वैभव नाईक यांच्या एकनाथ शिंदे यांच्यावरील आरोपांना प्रत्युत्तर दिले. शिंदे यांनी महाराष्ट्रात सर्वाधिक ५३ सभा घेतल्याचे नमूद करत, वैभव नाईकांनी केलेले आरोप निराशेपोटी आणि राजकीय अपरिपक्वतेचे लक्षण असल्याचे सामंत यांनी म्हटले. तर सामंत यांनी यावेळी नैसर्गिक आपत्तीच्या वेळी सिंधुदुर्गमध्ये एकनाथ शिंदे यांनी वैभव नाईकांच्या मतदारसंघात केलेल्या मदतीची आठवण करून दिली. एकनाथ शिंदे यांनी अनेक घरांना छत निर्माण करून दिले होते, आणि हा प्रयत्न वैभव नाईक यांचे राजकीय व्यक्तिमत्व टिकून रहावे यासाठीच होता असे सामंत यांनी अधोरेखित केले. नाईकांनी केलेल्या आरोपांमध्ये प्रचंड राजकीय अपरिपक्वता दिसून येते, असे सामंत म्हणाले.

जो नेता आठ-आठ दिवस प्रचारात व्यस्त असतो, त्याच्याकडे कपड्यांच्या बॅगा असणे स्वाभाविक आहे. शिंदेंकडे एवढे कार्यकर्ते आहेत की त्यांना कुठेही पैशाची आवश्यकता नाही, कार्यकर्ते हीच त्यांची ताकद असल्याचे सामंत यांनी सांगितले. मालवण नगरपालिकेत वैभव नाईकांचे पॅनल तिसऱ्या क्रमांकावर जाईल, या निराशेपोटी हे आरोप केले जात असल्याचा दावा सामंत यांनी केला. राजकारणात मदत करणाऱ्यांची आठवण ठेवावी, अशी विनंतीही सामंत यांनी वैभव नाईकांना मित्र म्हणून केली.

Published on: Dec 02, 2025 04:03 PM