Maharashtra Local Body Election : राणे बंधूंच्या लढाईत निलेश राणेंची सरशी; मालवण, कणकवलीत नितेश राणेंना धक्का

| Updated on: Dec 22, 2025 | 11:25 AM

कोकणातील मालवण आणि कणकवली स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत निलेश राणे यांच्या गटाने भाजप आणि मंत्री नितेश राणे यांना मोठा धक्का दिला आहे. निलेश राणेंच्या नेतृत्वाखालील शहर विकास आघाडीने विजय मिळवत भाजपला पराभूत केले. यामुळे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनाही मोठा धक्का बसल्याचे म्हटले जात आहे.

कोकणातील मालवण आणि कणकवली नगर परिषदेच्या निकालांनी राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली आहे. राणे बंधूंमधील राजकीय लढाईत निलेश राणे यांच्या गटाने भाजप आणि मंत्री नितेश राणे यांना जबर धक्का दिला आहे. मालवण आणि कणकवली या दोन्ही नगरपालिकांमध्ये भाजप आणि नितेश राणे यांना मोठा झटका बसला असून, निलेश राणेंच्या नेतृत्वाखालील शहर विकास आघाडीने निर्णायक विजय मिळवला आहे. मालवण नगर परिषदेत शिंदे गटाच्या शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार ममता वराडकर यांनी भाजपच्या शिल्पा खोत यांचा पराभव केला.

कणकवलीमध्ये तर नितेश राणे यांना घेरण्यासाठी त्यांचे बंधू निलेश राणे यांच्यासह ठाकरेंची शिवसेना आणि इतर सर्व पक्षांनी एकत्र येत शहर विकास आघाडी स्थापन केली होती. या आघाडीचे संदेश पारकर विजयी झाले असून, त्यांनी भाजपच्या समीर नलावडे यांना पराभूत केले. या निकालांमुळे केवळ नितेश राणेच नव्हे, तर कोकणातील भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनाही धक्का बसला आहे. रवींद्र चव्हाण यांनी या निवडणुकांमध्ये भाजपसाठी चांगलीच ताकद लावली होती. विजयानंतर प्रतिक्रिया देताना निलेश राणे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. बघा काय म्हणाले ते..?

Published on: Dec 22, 2025 11:25 AM