Rahul Shewale यांनी स्पष्टच सांगितलं… कसा असणार महायुतीत जागा वाटपाचा फॉर्म्युला

Rahul Shewale यांनी स्पष्टच सांगितलं… कसा असणार महायुतीत जागा वाटपाचा फॉर्म्युला

| Updated on: Sep 01, 2023 | 5:17 PM

VIDEO | देशभरातील नेते इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी का राहिलेत उपस्थित? इंडिया आघाडीची बैठक आणि महायुतीची बैठक नेमकी का घेण्यात येतेय? राहुल शेवाळे यांनी थेट कारणच सांगितलं, म्हणाले...

मुंबई, १ सप्टेंबर २०२३ | इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी देशभरातून विविध नेते दाखल झाले आहेत तर दुसरीकजे आज महायुतीही बैठक होत आहे. महायुतीच्या बैठकीचं आयोजन नेमकं कशासाठी करण्यात आलंय, यावर शिवसेना खासदार राहूल शेवाळे यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले, ‘आगामी लोकसभेत ४८ उमेदवार कसे निवडून येतील याचा संकल्प करण्यासाठी महायुतीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. तर दुसरीकडे इंडिया आघाडीची बैठक ही त्यांनी आपल्या परिवाराला वाचवण्यासाठी घेण्यात आली आहे. या बैठकीत तुम्ही बघाल तर पक्ष नेता आपल्या मुलाला घेऊन आल्याचे पाहायला मिळेल. एकीकडे राष्ट्रप्रेम तर दुसरीकडे पुत्रप्रेम दिसून येत आहे. तर जनतेचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास आहे आणि त्यांचा पाठिंबा त्यांना आहे.’ शिवसेना खासदार राहूल शेवाळे यांनी म्हटले आहे. तर यावेळी राहुल शेवाळे यांनी महायुतीमध्ये कशाप्रकारे जागा वाटप होणार आहे? असा प्रश्न विचारला असता राहुल शेवाळे यांनी स्पष्टच म्हटले की, ‘महायुतीमध्ये जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यावर पूर्ण चर्चा झाली आहे. त्याबाबत कोणताही तिढा नाही’

Published on: Sep 01, 2023 05:17 PM