Shirkant Shinde : आयकरची नोटीस आली की नाही? पत्रक काढत श्रीकांत शिंदेंचं स्पष्टीकरण, पत्रात काय म्हटलंय?
खासदार श्रीकांत शिंदे यांनी आयकर विभागाकडून कोणतीही नोटीस मिळाल्याचे स्पष्टपणे नाकारले आहे. याबाबत त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्या विधानाचा विपर्यास झाल्याचे स्पष्टीकरण दिले.
शिवसेना मंत्री संजय शिरसाट यांनी आपल्याला आयकर विभागाची नोटीस आली असल्याचे ऑन कॅमेरा सांगितलं. पण त्याच वेळी खासदार श्रीकांत शिंदे यांचाही उल्लेख करण्यात आला होता. पण श्रीकांत शिंदे यांना आयकरची नोटीस आली आहे की नाही हे माहीत नाही, असं शिरसाट म्हणाले. दरम्यान, यावर शिवसेना खासदार श्रीकांत शिंदेंकडून स्पष्टीकरण देण्यात आलंय. मला आयकर विभागाची कोणतीही नोटीस आलेली नाही असं खासदार श्रीकांत शिंदे यांच्याकडून सांगण्यात आलं आहे. तर मंत्री संजय शिरसाट यांच्या विधानाचा विपर्यास केला गेला असं म्हणत एक पत्र काढत श्रीकांत शिंदे यांच्याकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे.
पत्रकात काय म्हटलंय?
मला आयकर विभागाची कोणतीही नोटीस आलेली नाही. सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्या विधानाचा विपर्यास करण्यात आला. काही प्रसार माध्यमांशी संवाद साधताना संजय शिरसाट यांच्या तोंडी वाक्य घालून विपर्यास केला गेला असल्याचे श्रीकांत शिंदे म्हणाले.
