‘ऑपरेशन टायगर’मध्ये पुढचा नंबर कोणाचा? भास्कर जाधव की…, डॅमेज कंट्रोल रोखण्यासाठी ठाकरेंनी बोलवली बैठक

‘ऑपरेशन टायगर’मध्ये पुढचा नंबर कोणाचा? भास्कर जाधव की…, डॅमेज कंट्रोल रोखण्यासाठी ठाकरेंनी बोलवली बैठक

| Updated on: Feb 18, 2025 | 11:38 AM

ऑपरेशन टायगरमध्ये शिंदे यांच्या शिवसेनेने उद्धव ठाकरे यांच्या नेत्यांकडे मोर्चा वळवला आहे. राजन साळवी, सुभाष बने यांच्यानंतर आता भास्कर जाधव आणि वैभव नाईक यांना उघड ऑफर देण्यात आली आहे. तर डॅमेज कंट्रोल रोखण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी आमदार खासदारांची बैठक बोलावली आहे.

कोकणातले ठाकरे यांच्या शिवसेनेचे एकमेव आमदार भास्कर जाधव आणि माजी आमदार वैभव नाईक. ठाकरे यांच्या शिवसेनेमधल्या या दोन्ही फायर ब्रँड नेत्यांकडे शिंदे यांच्या शिवसेनेने मोर्चा वळवला. ठाकरे यांच्या शिवसेनेत नाराज असलेल्या जाधवांनी वाघाच्या कळपातील यावं अशी ऑफर शिंदे यांचे मंत्री संजय शिरसाट यांनी दिली आहे. तर वैभव नाहीक यांवरून ही चर्चा सुरू आहे, असा दावा भरत गोगावले यांनी केला आहे. भास्कर जाधव सारखा चांगला आमदार जो अभ्यासू आहे. आक्रमक आहे आणि स्पष्ट बोलणारा आहे. शिंदे यांच्या शिवसेनेने ऑपरेशन टायगर सुरू केलंय. त्यानुसार राजन साळवी आणि सुभाष बने हे दोन्ही माजी आमदार शिंदेसोबत आले आहेत. आता भास्कर जाधव आणि वैभव नाईक यांना ही खुली ऑफर देण्यात आली आहे. राजन साळवी यांकडे एसीबीच्या चौकशीचा ससेमीरा लागला होता. त्यानंतर ते एक दोन वेळा उद्धव ठाकरे यांना भेटले आणि अखेर शिंदेंकडे आले. तशीच एसीबीची चौकशी वैभव नाईक यांची झाली आणि तेही मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी आले. मात्र याभेटी आधी त्यांनी आपण उद्धव ठाकरे सोबतच राहणार असल्याचे सांगितलं आहे. विशेषतः कोकणामध्ये शतःप्रतिशत शिवसेना हे धोरण एकनाथ शिंदे यांनी आखल्याचे दिसते आणि त्यानुसार ठाकरे यांचा एक एक मोहरा गळाला लावण्याचे काम शिंदे यांच्या शिवसेनेकडून सुरू आहे आणि त्यामुळेच डॅमेज रोखण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भवनात 20 तारखेला खासदारांची आणि 25 फेब्रुवारीला आमदारांची बैठक बोलावली आहे.

Published on: Feb 18, 2025 11:38 AM