Ratnagiri मधील शिवसेनेतील रिफायनरी समर्थकांचा भाजपमध्ये प्रवेश
शिवसेनेचे नाणार पंचक्रोशीतले सक्रिय कार्यकर्ते आणि सदस्यांचा यात समावेश आहे. रत्नागिरी रिफायनरी प्रकल्पाचा विरोध शिवसेनेला भोवण्याची चिन्हे आहेत. (Shiv Sena refinery supporters from Ratnagiri join BJP)
रत्नागिरी : नाणार रिफायनरी प्रकल्पात मोठं राजकीय ट्विस्ट पहायला मिळतंय. रत्नागिरी रिफायनरीला विरोध करणाऱ्या शिवसेना पक्षाला मोठा धक्का बसला आहे. प्रकल्पाच्या बाबतीत विरोधात भूमिका घेतल्याने रिफायनरीचे समर्थन करणाऱ्या शिवसैनिकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. नाणार पंचक्रोशीतील तारळ, कुंभवडे, अणुसुरे आणि मिठगवाणेमधील 50 ते 70 कार्यकर्त्यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. रत्नागिरी रिफायनरीला समर्थन केल्याने शिवसेनेतून हकालपट्टी झालेले नाणारचे विभाग प्रमुख राजा काजवे यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्याचबरोबर नाणारचे उपविभाग प्रमुख सुहास कुवरे यांनी देखील भाजपचा झेंडा हाती घेतला. तर कोकण जनकल्याण प्रतिष्ठान अध्यक्ष पंढरी आंबेरकर यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. शिवसेनेचे नाणार पंचक्रोशीतले सक्रिय कार्यकर्ते आणि सदस्यांचा यात समावेश आहे. रत्नागिरी रिफायनरी प्रकल्पाचा विरोध शिवसेनेला भोवण्याची चिन्हे आहेत.
