भूषण देसाई निव्वळ भ्रष्टाचाराने बरबटलेली व्यक्ती; भाजपचा प्रवेशावर तीव्र विरोध

भूषण देसाई निव्वळ भ्रष्टाचाराने बरबटलेली व्यक्ती; भाजपचा प्रवेशावर तीव्र विरोध

| Updated on: Mar 14, 2023 | 10:04 AM

भूषण देसाई यांच्या या पक्ष प्रवेशाला मात्र भाजपकडून विरोध असल्याचे समोर येत आहे

मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांचे पूत्र भूषण देसाई यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यावर सुभाष देसाई यांनी, “माझा मुलगा भूषण देसाई याने आज शिंदे गटात प्रवेश केला ही घटना माझ्यासाठी क्लेशदायक असल्याचे म्हटले होते. त्यानंतर या पक्ष प्रवेशावर अनेकांच्या प्रतिक्रिया आल्या आहेत. याचदरम्यान भूषण देसाई यांच्या या पक्ष प्रवेशाला मात्र भाजपकडून विरोध असल्याचे समोर येत आहे. उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय मातोश्रीचे मुनीम आणि माजी उद्योग मंत्री सुभाष देसाई यांचे पुत्र भूषण देसाई यांची सामाजिक क्षेत्रात कवडीची किंमत नाही असा घणाघात भाजप विधानभा उपाध्यक्ष संदीप जाधव यांनी केला आहे. भूषण सुभाष देसाई यांचा शिवसेनेतील प्रवेश हा अतिशय वेदनादायक असल्याचेही त्यांनी म्हटलं आहे.

Published on: Mar 14, 2023 10:00 AM