Uddhav Thackeray : ‘… तो जय महाराष्ट्र बोलना होगा’; ‘हिंदी’सक्तीच्या निर्णयावरून उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला

Uddhav Thackeray : ‘… तो जय महाराष्ट्र बोलना होगा’; ‘हिंदी’सक्तीच्या निर्णयावरून उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला

| Updated on: Apr 19, 2025 | 2:49 PM

'आपलं सरकार असताना कुणाची हिंमत नव्हती. आपलं सरकार गद्दारी करून पाडल्यानंतर त्यांच्या पालख्या वाहत आहेत. मराठीची गळचेपी करणाऱ्यांचे पाय चाटत आहेत. हे कसले बाळासाहेबांचे विचार पुढे नेणार आहेत. महाराष्ट्राच्या मारेकऱ्यांची सुपारी घेणारं हे सरकार आहे का?'

भारतीय कामगार सेनेची वार्षिक सर्वसाधारण सभा आज पार पडली. या सभेत शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संबोधित केले. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केले. हिंदी भाषा सक्तीच्या निर्णयावरून उद्धव ठाकरेंनी भाजपला टोला लगावला. यावेळी महाराष्ट्राच्या मारेकऱ्यांची सुपारी घेणारं हे सरकार आहे का? असा सवाल देखील त्यांनी केला. महाराष्ट्रात मराठी भाषा सक्तीची करण्याचा निर्णय माझ्या सरकारने घेतला आहे, याचा मला अभिमान असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. पुढे त्यांनी हिंदी सक्तीवर देखील भाष्य केले. ते म्हणाले, ‘जो महाराष्ट्रात राहतो त्याला मराठी आलीच पाहिजे. तुम्ही हिंदीची सक्ती करत असाल, होऊ देणार नाही हा भाग वेगळा आहे, सर्व दुकानावर पाट्या मराठीत लिहिण्याचा आम्ही कायदा केला पण या सरकारने त्याची किती अंमलबजावणी केली. काही नतद्रष्ट कोर्टात गेले. अरे इथे राहता, इथलं मिठ खाता आणि मराठीला विरोध करता?’ असा सवाल त्यांनी केला.

महाराष्ट्राचे मारेकरी त्यांची सुपारी घेतलेले सत्ताधारी दुर्देवाने महाराष्ट्राला लाभले का? पण यांचं सरकार आल्यावर मराठी नही आती. मराठी लोक गंदे है, वह नॉनव्हेज खाते है. जसं आपण म्हटलं होतं ना इस देश में रहना होगा तो वंदे मातरम बोलना होगा, तसं इस राज्य में रहना होगा तो जय महाराष्ट्र बोलना होगा, असं म्हणत भाजपवर हल्लाबोल केला.

Published on: Apr 19, 2025 02:49 PM