Uddhav Thackeray : ठाकरे बंधू एकत्र येणार? मनसेसोबत युती चालेल का? उद्धव ठाकरेंचा थेट सवाल, पदाधिकाऱ्यांकडून कोणता सिग्नल?
मनसे सोबत युती केली तर चालेल का? असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना विचारला अशी माहिती मिळते.जे लोकांच्या मनात तेच आमच्या मनात, असं आदित्य ठाकरे यांनी सुद्धा म्हटले. या संदर्भात त्यांनी हे वक्तव्य केलं.
मनसे सोबत युती केली तर चालेल का? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना केलाय. तर मनसे सोबतच्या युतीसाठी पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरेंना ग्रीन सिग्नल दिलाय. जे लोकांच्या मनात तेच आमच्या मनात असं आदित्य ठाकरे म्हणाले. सध्या मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये युती होणार असल्याच्या चर्चनांनी जोर धरलाय. जे लोकांच्या मनात आहे तेच आमच्या मनात आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाल्याचं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं.
तर उद्धव ठाकरे यांनी सुद्धा पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची मत जाणून घेतली आहेत. मनसे सोबत युती केली तर चालेल का? असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी आपल्या पदाधिकाऱ्यांना विचारला. तर भाजप आणि शिंदे यांच्या शिवसेनेच्या नेत्यांनी मात्र दोन्ही ठाकरेंच्या युतीमुळे फरक पडणार नाही असं म्हटलंय. तर दुसरीकडे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या युतीच्या चर्चनांवर जयंत पाटील यांनी टोला लगावलाय. राज ठाकरे आमच्यासोबत आल्यास महाविकास आघाडीची ताकद वाढेल असं जयंत पाटील यांनी म्हटलंय.
