राजकोटच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या गगनचुंबी पुतळ्याचं काम पूर्णत्वाकडे

राजकोटच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या गगनचुंबी पुतळ्याचं काम पूर्णत्वाकडे

| Updated on: Apr 20, 2025 | 3:16 PM

मालवण राजकोटमधील शिवरायांच्या हातात तलवार देण्याचं काम पूर्ण झालेलं आहे. येत्या 1 मे रोजी या पुतळ्याचं लोकार्पण केलं जाणार आहे.

मालवण राजकोटमधील शिवरायांच्या हातात तलवार देण्याचं काम पूर्ण झालेलं आहे. त्यामुळे शिवरायांच्या पुतळ्याबाबत पर्यटकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. शिवरायांच्या या पुतळ्याचं काम जवळपास पूर्ण होत आलेलं आहे.

राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला जातो आहे. मालवणच्या सिंधुदुर्ग किल्ल्याच्या बाजूलाच या पुतळ्याचं काम सुरू आहे. शिवरायांच्या या पुतळ्याचं काम आता पूर्णत्वाकडे आहे. त्यामुळे पर्यटकांना देखील याबद्दल उत्सुकता लागून राहिलेली आहे. छत्रपरि शिवाजी महाराजांच्या हातात तलवार देण्याचं काम पूर्ण झालेलं आहे. प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांच्या संकल्पनेतून या पुतळ्याचं काम गेल्या कित्येक दिवसांपासून सुरू आहे. 1 मे रोजी या पुतळ्याचं काम पूर्ण झाल्यानंतर याचं लोकार्पण केलं जाणार आहे.

Published on: Apr 20, 2025 03:09 PM