Pune Bull Race | कोरेगाव-भीमा कार्यक्रमाला परवानगी, बैलगाडा शर्यत का नाही? आढळराव पाटलांचा ठिय्या

Pune Bull Race | कोरेगाव-भीमा कार्यक्रमाला परवानगी, बैलगाडा शर्यत का नाही? आढळराव पाटलांचा ठिय्या

| Edited By: | Updated on: Jan 01, 2022 | 10:56 AM

बैलगाडा शर्यतीला स्थगिती दिल्यामुळे शिवाजीराव आढळराव पाटील यांनी घाटात ठिय्या आंदोलन सुरु केलं आहे.  शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासोबत बैलगाडा मालकांनी देखील आंदोलन सुरू केलं आहे.

पुणे :  बैलगाडा शर्यतीला अचानक स्थगिती दिल्यामुळे बैलगाडा मालकांकडून सरकारचा निषेध करण्यात आला आहे.  एकीकडे भीमा कोरेगावच्या कार्यक्रमाला परवानगी दिली जाते मग बैलगाडा शर्यतीला का नाही ?, असा सवाल बैलगाडा मालकांनी प्रशासनाला केला आहे. शर्यतीला अचानक स्थगिती दिल्यामुळे बैलगाडा मालकांमध्ये निराशा पसरलीय. बैलगाडा शर्यतीसंदर्भात राजकारण झाल्याचा आरोप शिवसेना नेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केलाय.   बैलगाडा शर्यतीला स्थगिती दिल्यामुळे शिवाजीराव आढळराव पाटील यांनी घाटात ठिय्या आंदोलन सुरु केलं आहे.  शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासोबत बैलगाडा मालकांनी देखील आंदोलन सुरू केलं आहे. यासंदर्भात मुख्यमंत्र्याशी बोलणार असल्याचं शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले.