किल्ले रायगडावर होऊ घातलेल्या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. गेल्यावर्षी शिवजयंतीच्या दिवशी रायगडावर करण्यात आलेल्या रोषणाईवरुन वाद उद्भवला होता. ही रोषणाई शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांच्या फंडातून करण्यात आली होती. मात्र, या डिस्को पद्धतीच्या रोषणाईवर संभाजीराजे छत्रपती यांच्यासह अनेकांनी आक्षेप घेतला होता. त्यामुळे शिवराज्याभिषेक दिनाच्या (shivrajyabhishek sohala 2021) पूर्वसंध्येला रायगडावर पारंपरिक रोषणाई करण्यात आली आहे.