Thackeray-Shinde : नजर रोखली अन् खुन्नस… शिंदे अन् ठाकरे पुन्हा आमने-सामने, वरळी कोळीवाड्यात नेमकं घडलं काय?

Thackeray-Shinde : नजर रोखली अन् खुन्नस… शिंदे अन् ठाकरे पुन्हा आमने-सामने, वरळी कोळीवाड्यात नेमकं घडलं काय?

| Updated on: Aug 09, 2025 | 12:04 PM

मुंबईतल्या वरळी कोळीवाड्यात आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे आमने सामने आले. नारळी पौर्णिमेनिमित्ताने वरळी कोळीवाड्यात मोठा उत्सव असतो आणि या उत्सवादरम्यानच आदित्य ठाकरे आणि शिंदे एकमेकांच्या समोर आले.

आदित्य ठाकरे यांच्या मतदार संघात वरळी कोळीवाड्यात एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे आमने सामने आले. नारळी पौर्णिमेनिमित्त वरळी कोळीवाड्यात दोन्ही शिवसेनेकडून कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. आदित्य ठाकरे येण्याआधीच एकनाथ शिंदे वरळी कोळीवाड्यात दाखल झाले. वरळी गावातील मुख्य रस्त्यावरून एकनाथ शिंदे कोळी बांधवांच्या सणात सहभागी झाले. तर थोड्याच वेळात आदित्य ठाकरे हे सुद्धा वरळी कोळीवाड्यात पोहोचल्याचे पाहायला मिळाले.

दरम्यान त्या ठिकाणी मुख्य चौकात शिंदे आणि ठाकरे आमने-सामने आले. एकनाथ शिंदेंना वाट करून देण्यासाठी पोलिसांनी आदित्य ठाकरेंना काही वेळासाठी थांबवलं. यावेळी आदित्य ठाकरे काही काळ एकनाथ शिंदे यांच्याकडे रोखून पाहत असल्याचे दिसले. काही महिन्यांपूर्वी एक बैठक झाली होती. त्यातही आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे आमने-सामने आले होते. यावेळीही त्यांनी शिंदेंकडे नजर रोखून पाहिलं होतं. शिवसेनेत फूट पडल्यानंतर ठाकरे आणि शिंदे मधून विस्तवही जात नाही आणि काल पुन्हा एकदा त्याचीच प्रचिती आली.

Published on: Aug 09, 2025 12:04 PM