Special Report | राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात शिवसेना आक्रमक

| Updated on: Sep 05, 2021 | 10:42 PM

शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि उपनेते रवींद्र मिर्लेकर (Ravindra Mirlekar) सध्या पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. शिरुर लोकसभा मतदारसंघ दोघा नेत्यांनी पिंजून काढलाय.

Follow us on

सध्या राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असणाऱ्या खेड आणि शिरुरकडे शिवसेनेनं मोर्चा वळवला आहे. खासदार संजय राऊत दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर आहेत.   शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि उपनेते रवींद्र मिर्लेकर (Ravindra Mirlekar) सध्या पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. शिरुर लोकसभा मतदारसंघ दोघा नेत्यांनी पिंजून काढलाय. खेड-जुन्नर या एकेकाळच्या सेनेच्या बालेकिल्ल्यात सध्या राष्ट्रवादीचे आमदार आहेत. तर शिरुर लोकसभेत कोल्हेंनी आढळरावांना खासदारकीचा चौकार मारु दिला नाही. शिवसेनेला हीच मोठी खंत आहे. कालपासून राऊत-मिर्लेकर आपल्या भाषणांत राष्ट्रवादीला इशाऱ्यावर इशारे देतायत. काल खेडमध्ये बोलताना राऊतांनी राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांना आव्हान दिलं तर आज उपनेते मिर्लेकरांनी शिरुरच्या आमदारांना इशारा दिलाय. डिवचू नका, नाहीतर सोडणार नाही, अशा शब्दात त्यांनी शिरुरचे आमदार अशोक पवार यांना सज्जड दम दिलाय.