‘तो माझाच माल, त्याला कोणाची काही…’, राऊतांच्या घराच्या रेकीवरून शिवसेनेच्या बड्या नेत्याचा टोला

‘तो माझाच माल, त्याला कोणाची काही…’, राऊतांच्या घराच्या रेकीवरून शिवसेनेच्या बड्या नेत्याचा टोला

| Updated on: Dec 20, 2024 | 9:12 PM

Sanjay Raut bungalow Reiki :संजय राऊत यांच्या घराची रेकी कोणी करणार? तो माझा माल आहे. रेकी करण्यासाठी संजय राऊत यांनीच माणसे पाठवली असतील, असा टोला राज्याचे कॅबिनेट मंत्री गुलाबराव पाटील यांनी संजय राऊत यांना लगावला.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांच्या घराची रेकी केल्याचा प्रकार समोर आला. संजय राऊत यांच्या भांडुपमधील मैत्री बंगल्याची दोन बाईकस्वारांनी रेकी केली यावेळी त्यांनी राऊतांच्या घराचे काही फोटोही काढले. हा सर्व प्रकार संजय राऊत यांच्या घराच्या सीसीटीव्हीमधून हा प्रकार उघड झाला आहे. संजय राऊत सकाळी ९.३० वाजता माध्यमांशी संवाद साधतात. त्यापूर्वी संजय राऊत यांच्या घराची रेकी दोन बाईकस्वारांनी केली. त्यांनी दहा मोबाईल कॅमेरे लावून रेकी केली. ही माहिती माध्यमांच्या प्रतिनिधींना समजल्यावर त्यांना रोखले. त्यानंतर ते बाईकस्वार पळून गेले. या प्रकारानंतर विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. इतकंच नाहीतर संजय राऊत यांच्या सुरक्षेची मागणीही केली जात आहे. अशातच फडणवीस सरकारमधील कॅबिनेट मंत्री आणि शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी भाष्य करत संजय राऊतांनाच खोचक टोला लगावला आहे. ‘संजय राऊत यांच्या घराची रेकी कोणी करणार? तो माझा माल आहे. रेकी करण्यासाठी संजय राऊत यांनीच माणसे पाठवली असतील’, असा टोला गुलाबराव पाटील यांनी संजय राऊत यांना लगावला.

Published on: Dec 20, 2024 09:12 PM