Sanjay Raut Live | आमच्यात फूट पाडण्याचा प्रयत्न यशस्वी होणार नाही : संजय राऊत

Sanjay Raut Live | आमच्यात फूट पाडण्याचा प्रयत्न यशस्वी होणार नाही : संजय राऊत

| Edited By: | Updated on: Jun 21, 2021 | 11:24 AM

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या लेटर बॉम्बनंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपवर हल्ला चढवला आहे. त्यांनी भाजप नेत्यांवर जबरदस्त टीका केली आहे.

काही दिवसांपूर्वीच शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी फोडलेल्या लेटर बॉम्बनंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. ‘सत्ता गेल्यापासून काही लोकांची पोटदुखी सुरू झाली आहे. त्यामुळे विनाकारण त्रास देण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण आमच्यात फूट पाडण्याचा प्रयत्न यशस्वी होणार नाही’ असं म्हणत थेट भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे.