Vinayak Raut | देवेंद्र फडणवीसांच्या अज्ञानाला काय म्हणावं कळत नाही, विनायक राऊतांची टीका
देवेंद्र फडणवीसांना शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. याआधी अनेकदा सावरकरांवरून भाजप आणि शिवसेनेत खडजंगी झाल्याचं पहायला मिळालं आहे आणि आता पुन्हा तोच वाद सुरू झाला आहे.
सिंधुदुर्ग : राज्यात पुन्हा सावरकरांवरून भाजप आणि शिवसेना आमनेसामने आले आहेत. सावरकरांच्या विषयावर बोलताना फडणवीसांनी शिवसेनेवर तोफ डागली. शिवसेनेला लाज वाटली पाहिजे, अशा शब्दात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी टीका केल्यानंतर शिवसेनेकडून आता तीव्र प्रतिक्रिया येऊ लागल्या आहे. देवेंद्र फडणवीसांना शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. याआधी अनेकदा सावरकरांवरून भाजप आणि शिवसेनेत खडजंगी झाल्याचं पहायला मिळालं आहे आणि आता पुन्हा तोच वाद सुरू झाला आहे.
