Arvind Sawant | अदानींचा मनमानी कारभार, देशच विकत घेतल्यासारखे वागत आहेत : अरविंद सावंत

Arvind Sawant | अदानींचा मनमानी कारभार, देशच विकत घेतल्यासारखे वागत आहेत : अरविंद सावंत

| Edited By: | Updated on: Aug 02, 2021 | 6:41 PM

हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा, शिवाजी महाराजांचा अपमान आहे. महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा, मराठी माणसाचा अपमान असल्याची प्रतिक्रिया देत  अरविंद सावंत यांनी अदानी बोर्डची तोडफोड करणाऱ्या भारतीय कामगार सेनेच्या कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आहे.

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर अदानी एअरपोर्ट्स नाव लावल्याने शिवसेना आक्रमक झाली. मॅनेज्ड बाय अदानी एअरपोर्ट असाच फलक लावण्याची मागणी केली. जीवेकेनेही तसाच बोर्ड लावला होता. वीआयपी गेट नंबर ८ आणि विलेपार्ले हायवेवरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासमोरील बोर्ड लाठ्यांनी तोडला. १५ मिनिटं शिवसैनिकांचा तुफान राडा झाला. याबाबत शिवसेना खासदार यांनी अदानी कंपनीचा चांगलाच समाचार घेतला आहे. हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा, शिवाजी महाराजांचा अपमान आहे. महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा, मराठी माणसाचा अपमान असल्याची प्रतिक्रिया देत  अरविंद सावंत यांनी अदानी बोर्डची तोडफोड करणाऱ्या भारतीय कामगार सेनेच्या कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आहे.