Sanjay Raut | परमेश्वर कुठल्याच पक्षाचा नसतो, राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा

Sanjay Raut | परमेश्वर कुठल्याच पक्षाचा नसतो, राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा

| Edited By: | Updated on: Jun 05, 2021 | 1:54 PM

परमेश्वर हा कुठल्याही पक्षाचा मेंबर नसतो, तो कधीच मध्यस्थाची भूमिका घेत नाही. त्यामुळे अशा गोष्टी या परमेश्वरावर सोडून द्यायच्या नसतात. जो परमेश्वरावर विसंबून राजकारण करतो त्याला स्वत: परमेश्वरही मदत करत नाही. राजकारण हे आपलं आपण करायचं असतं, असे संजय राऊत यांनी म्हटले. संजय राऊत यांच्या या तिखट भाषेतील टीकेला ‘मनसे’कडून काय प्रत्युत्तर देण्यात येणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.