Ambadas Danve : फक्त शेतकऱ्यांसाठी पैसा नाही.. बाकी सगळं ओक्के, दानवेंकडून थेट पैशांची बंडले VIDEO ट्विट

| Updated on: Dec 09, 2025 | 11:54 AM

अंबादास दानवे यांनी एका व्हिडिओद्वारे सरकारवर टीका करत "कर्जमाफीला पैसा नाही, बाकी सगळं ओके आहे" असा सवाल केला. रायगडचे आमदार महेंद्र दळवी यांच्यासोबत पैशांचे बंडल असल्याचा दावा दानवेंनी केला. दळवींनी हा व्हिडिओ आपला नसल्याचे सांगत दानवेंना आव्हान दिले. नागपूर हिवाळी अधिवेशनात या प्रकरणावर चर्चा अपेक्षित आहे.

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी ट्विट केलेल्या एका व्हिडिओमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या व्हिडिओद्वारे त्यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली असून, “सरकारकडे कर्जमाफीला पैसा नाही, बाकी सगळं ओके आहे,” असा सवाल उपस्थित केला आहे. दानवेंनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना उद्देशून विचारले आहे की, “जनतेला सांगा, व्हिडिओतील हे आमदार कोण आहेत आणि ते पैशांच्या गड्ड्यांसह काय करत आहेत?” दानवेंनी ट्विट केलेल्या व्हिडिओमध्ये रायगडचे आमदार महेंद्र दळवी दिसत असल्याचा दावा करण्यात आला आहे, ज्यात ते पैशांच्या बंडलांसोबत असल्याचे दर्शवले आहे. हा व्हिडिओ हिवाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस गाजवण्याची शक्यता आहे. यापूर्वी संजय राऊत यांनी संजय शिरसाट यांच्याबाबत असाच एक व्हिडिओ ट्विट केला होता, त्याची आठवण करून दिली जात आहे. सरकारच्या आर्थिक परिस्थितीबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी केलेल्या वक्तव्यानंतर विरोधकांनी या मुद्द्यावर सरकारवर ताशेरे ओढले आहेत.

Published on: Dec 09, 2025 11:54 AM