Wardha | मास्क न लावल्याच्या कारणावरून उदय सामंत यांच्यासमोरच हाणामारी
मास्क न लावल्याच्या कारणावरुन शिवसैनिक आपापसात भिडल्याचा प्रकार समोर आला आहे. उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री, शिवसेना नेते उदय सामंत यांच्यासमोर वर्ध्यात ही घटना घडल्याची माहिती आहे.
मास्क न लावल्याच्या कारणावरुन शिवसैनिक आपापसात भिडल्याचा प्रकार समोर आला आहे. उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री, शिवसेना नेते उदय सामंत यांच्यासमोर वर्ध्यात ही घटना घडल्याची माहिती आहे. एका गटाकडून संपर्क प्रमुखाला मारल्याचा, तर दुसऱ्या गटाकडून ‘शिवप्रसाद’ दिल्याचा दावा केला जात आहे. ही घटना कॅमेरामध्ये कैद झाली आहे.
वर्ध्याच्या स्थानिक विश्रामगृहात शुक्रवारी (9 जुलै) दुपारी हा गोंधळ झाला. घडलेल्या घटनेचा व्हिडीओ शनिवारी व्हायरल झाल्यानंतर हा प्रकार समोर आला. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत काल वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी मास्क न लावताच एक व्यक्ती उदय सामंत यांच्या स्वागताला जात असल्याच्या कारणातून वाद झाल्याची माहिती आहे.
