Vaishnavi Hagawane Case धक्कादायक माहिती उघड, वैष्णवीच्या आत्महत्येपूर्वी 8 दिवस… नवरा शंशाकचं अमानुष कृत्य समोर

Vaishnavi Hagawane Case धक्कादायक माहिती उघड, वैष्णवीच्या आत्महत्येपूर्वी 8 दिवस… नवरा शंशाकचं अमानुष कृत्य समोर

| Updated on: May 29, 2025 | 3:23 PM

वैष्णवीचा पती शशांक हगवणेकडून तिला मारहाण करण्यात आली आणि निलेश चव्हाण आणि करिश्मा हगवणे वैष्णवीला वारंवार मानसिक त्रास देत असल्याची माहिती पोलीस तपासातून समोर आले आहे

वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी एक धक्कादायक माहिती उघड झाली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी पती शशांक हगवणेकडून वैष्णवीला 8 दिवस विविध हत्यारांनी मारहाण करण्यात आली होती. ही माहिती सुरू असलेल्या पोलीस तपासातून समोर आली आहे. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये वैष्णवी हगवणेच्या अंगावर काही जखमा आढळल्या होत्या. दरम्यान तपास सुरू असताना आत्महत्येपूर्वी नेमकं काय घडलं? याची माहिती समोर आली आहे. सलग 8 दिवस वैष्णवीला वेगवेगळ्या हत्यारांनी मारहाण करण्यात आलेले सर्व साहित्य, हत्यार पोलिसांनी जप्त केले आहे. पती शशांक हगवणे, सासू लता हगवणे, नणंद करिश्मा हगवणे, सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांनी वैष्णवीला लग्न झाल्यानंतर मानसिक त्रास देत मारहाण केली. तर सासरच्या छळाला कंटाळून वैष्णवीने आत्महत्या केल्याचे सांगितले जात होते. मात्र वैष्णवीच्या कुटुंबाने तिची हत्या केल्याचा दावा केला आहे.

Published on: May 29, 2025 03:19 PM