Sindhudurg | सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाचा कार्यक्रम, मुख्यमंत्री आणि राणे एकाच मंचावर येणार

| Updated on: Sep 28, 2021 | 11:27 AM

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळावरुन जोरदार राजकारण पाहायला मिळाल्यानंतर आता हे विमानतळ सुरू करण्यास नागरी हवाई वाहतूक महासंचालनालय (DGCA) ने परवानगी दिली आहे. चिपी विमानतळाच्या मुद्द्यावरुन काही दिवसांपूर्वीच केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिवसेना वाद पाहायला मिळाला होता.

Follow us on

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या हस्ते 9 ऑक्टोबरला सिंधुदुर्गातील बहुप्रतीक्षित चिपी विमानतळाचं उद्घाटन केलं जाणार आहे. या उद्घाटन सोहळ्याला भाजप खासदार आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनाही निमंत्रण देण्यात आलं आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि नारायण राणे एकाच मंचावर उपस्थित राहतील. याशिवाय उपमुख्यमंत्री अजित पवार, काँग्रेस नेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यासारखे नेतेही या सोहळ्याला हजेरी लावतील. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळावरुन जोरदार राजकारण पाहायला मिळाल्यानंतर आता हे विमानतळ सुरू करण्यास नागरी हवाई वाहतूक महासंचालनालय (DGCA) ने परवानगी दिली आहे. चिपी विमानतळाच्या मुद्द्यावरुन काही दिवसांपूर्वीच केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिवसेना वाद पाहायला मिळाला होता.