Solapur Flood Relief :  सोलापुरात पुन्हा रेड अलर्ट, पूरस्थितीची शक्यता, पूरग्रस्तांना उद्यापासून धान्याचे वाटप

Solapur Flood Relief : सोलापुरात पुन्हा रेड अलर्ट, पूरस्थितीची शक्यता, पूरग्रस्तांना उद्यापासून धान्याचे वाटप

| Updated on: Sep 26, 2025 | 5:53 PM

सांगोल्यामधून ३० टन चारा सोलापुरात आणण्यात आला असून, उद्या सांगलीमधूनही चारा येणार आहे. याव्यतिरिक्त, इतर जिल्ह्यांमधून ५० ते ६० मेट्रिक टन चारा आणण्याचे नियोजन असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, सोलापूरमध्येही प्रशासनाकडून मदतकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.

सोलापूर जिल्ह्यात पूरपरिस्थितीमुळे बाधित झालेल्या नागरिकांना उद्यापासून धान्याचे वाटप केले जाणार आहे. सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी ही माहिती दिली. पूरग्रस्त कुटुंबांना प्रत्येकी १० किलो तांदूळ आणि १० किलो गहू मोफत वाटप करण्यात येणार आहे. हे वाटप आज रात्रीपासून किंवा उद्या सकाळीपासून सुरू होईल. हवामान विभागाने सोलापूर, धाराशिव आणि अहिल्या नगर जिल्ह्यांसाठी उद्या आणि परवा रेड अलर्ट जारी केला आहे. या काळात सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे माढा, मोहोळ आणि करमाळा या तालुक्यांमध्ये पुन्हा पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. नागरिकांनी पुढील दोन दिवस घराबाहेर पडू नये आणि प्रशासनाशी संपर्कात राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले आहे. पूरग्रस्त भागातील जनावरांसाठी चाऱ्याची व्यवस्थाही करण्यात येत आहे.

Published on: Sep 26, 2025 05:53 PM