Solapur : बाळाला नुकताच जन्म अन् डिलिव्हरीनंतर टाके, तरीही 7 दिवस रूम स्वच्छतेची वेळ;  पुण्यानंतर सोलापुरात संतापजनक प्रकार

Solapur : बाळाला नुकताच जन्म अन् डिलिव्हरीनंतर टाके, तरीही 7 दिवस रूम स्वच्छतेची वेळ; पुण्यानंतर सोलापुरात संतापजनक प्रकार

| Updated on: Apr 10, 2025 | 5:12 PM

सोलापुरातील माढा तालुक्यातील खैराव गावाच्या हेमा शैलेश धडे या सोलापूरच्या माढा ग्रामीण रुग्णालयात प्रसूत झाल्या होत्या. या रुग्णालयात त्या एकूण सात दिवस होत्या. या सातही दिवस त्यांच्यावर स्वत: रुम साफ करण्याची वेळ आली आहे.

पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात गर्भवती महिलेच्या मृत्यू झाल्याचा प्रकार ताजा असतानाच सोलापूरच्या माढा ग्रामीण रुग्णालयातील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रसुती झालेल्या महिलेला स्वत:च ७ दिवस रुमची स्वच्छता करण्याची वेळ आल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. केवळ प्रसुती झालेल्या महिलेनेच रुमची स्वच्छता केली नाही तर तिच्या नवऱ्याने देखील तिच्या रूममधील टॉयलेट स्वच्छ केले. मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूरच्या माढा ग्रामीण रुग्णालयात हा संतापजनक प्रकार पाहायला मिळाला. हेमा धडे याचे सिजर झाले असून पोटाला टाके घातलेले असताना देखील त्यांनी रूग्णालयातील रुमची स्वच्छता केली. कारण रूममध्ये साफ-सफाई करण्यासाठी कर्मचारी न आल्याने त्यांनी आपल्या पतीसह ७ दिवस रुग्णालयाची स्वच्छता केल्याचं वास्तव उघडकीस आलं आहे. माढा तालुक्यातील खैराव गावच्या हेमा शैलेश धडे यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांनी आलेल्या विदारक अनुभव त्यांनी tv9 शी बोलताना सांगितला. दरम्यान, घडलेल्या प्रकारानंतर कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांसह संबधित अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी शिंदे गटाच्या शिवसेनेच्या शंभू साठे यांनी केली आहे.

Published on: Apr 10, 2025 05:12 PM