Special Report | गांधींचे गड असलेले रायबरेली, अमेठी कॉंग्रेसमुक्त!

| Updated on: Mar 13, 2022 | 10:54 PM

काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या लोकसभा मतदारसंघ असलेल्या रायबरेलीमध्येही काँग्रेसचा धुव्वा उडाला. रायबरेली जिल्ह्यातील 6 विधानसभा मतदारसंघात एकही काँग्रेस उमेदवार विजयी होऊ शकला नाही. इतकंच नाही तर काँग्रेसचा उमेदवार दुसऱ्या स्थानीही राहू शकला नाही. तसंच काँग्रेसच्या 6 पैकी 3 विधानसभा मतदारसंघात अनामत रक्कमही जप्त झालीय.

Follow us on

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठ्या आणि मानहाणीकारक पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. उत्तर प्रदेशात तर काँग्रेसची अवस्था अत्यंत वाईट झाल्याचं पाहायला मिळाली. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या लोकसभा मतदारसंघ असलेल्या रायबरेलीमध्येही काँग्रेसचा धुव्वा उडाला. रायबरेली जिल्ह्यातील 6 विधानसभा मतदारसंघात एकही काँग्रेस उमेदवार विजयी होऊ शकला नाही. इतकंच नाही तर काँग्रेसचा उमेदवार दुसऱ्या स्थानीही राहू शकला नाही. तसंच काँग्रेसच्या 6 पैकी 3 विधानसभा मतदारसंघात अनामत रक्कमही जप्त झालीय.

दुसरीकडे 2019 च्या लोकसभा निवडणुकीत अमेठीतून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनाही पराभवाचा सामना करावा लागला होता. भाजपच्या स्मृती इराणी यांनी राहुल गांधींना पराभवाची धुळ चारली होती. त्यानंतर आता पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीतही अमेठीत काँग्रेसचा धुव्वा उडाला.