Special Report | विस्तार रखडला; सचिवांना मंत्र्यांचे अधिकार-tv9

Special Report | विस्तार रखडला; सचिवांना मंत्र्यांचे अधिकार-tv9

| Updated on: Aug 06, 2022 | 9:19 PM

सचिवांना मंत्र्यांचे अधिकार देणं हे महाराष्ट्राचं दुर्दैवं असल्याचं विरोधक म्हणत असले तरी, भाजपनं हे चांगलं पाऊल असल्याचं म्हटलंय.  इकडे सामनातून पक्षप्रमुख आणि संपादक उद्धव ठाकरेंनी, मुख्यमंत्री शिंदेंवर बोचरी टीका केलीय...

मंत्रिमंडळ विस्तारासाठी कोणतीही अडचण नाही, असं मुख्यमंत्री म्हणतायत खरं…पण तरीही विस्तार काही झालेला नाही…फडणवीसांनंतर शिंदे पुन्हा दिल्लीत आलेत…दिल्लीत आल्यावर शिंदेंनी काय म्हटलं तेही ऐका. मंत्रिमंडळ विस्तार रखडल्यानं आता शिंदे-फडणवीसांनी महत्वाचा निर्णय घेतलाय. कॅबिनेट मंत्री आणि राज्यमंत्र्यांचे अधिकार आता सचिवांना देण्यात आलेत. म्हणजेच जे निर्णय मंत्री घ्यायचे ते निर्णय सचिवांना घेता येईल. मात्र सरकार स्थापन होऊनही जर नव्या मंत्र्यांचा शपथविधी होत नसेल…आणि अधिकाऱ्यांना मंत्र्यांचे अधिकार देण्यात येत असतील तर…मुख्य सचिवालाच मुख्यमंत्र्यांचेही अधिकार द्या, अशी टीका अजित पवारांनी केलीय. सचिवांना मंत्र्यांचे अधिकार देणं हे महाराष्ट्राचं दुर्दैवं असल्याचं विरोधक म्हणत असले तरी, भाजपनं हे चांगलं पाऊल असल्याचं म्हटलंय.  इकडे सामनातून पक्षप्रमुख आणि संपादक उद्धव ठाकरेंनी, मुख्यमंत्री शिंदेंवर बोचरी टीका केलीय…

Published on: Aug 06, 2022 09:19 PM