Special Report | तणावावेळीच ओवैसी बंधु महाराष्ट्रात कसे येतात ?

| Updated on: May 12, 2022 | 9:10 PM

एका कार्यक्रमानिमित्त एमआयएमचा चिथावणीखोर नेता अकबरुद्दीन ओवैसी औरंगाबादेत आला होता. आधी एका दर्ग्याला भेट दिली. त्यानंतर आजी खासदार जलील आणि माजी आमदार वारिस पठाण दोघांसोबत अकबरुद्दीन औरंगजेबाच्या समाधीवर गेला.

Follow us on

आम्ही कधीही औरंगजेबापुढे नतमस्तक होत नाही, असं म्हणणारे खासदार जलील स्वतः औरंगजेबाच्या समाधीवर फुलं वाहतायत. माध्यमांसमोर ऐटीत बोलायचं, आणि पक्षाचा बडा नेता आला की औरंगजेबाच्या समाधीवर वाकून फुलं चढवायची. एका कार्यक्रमानिमित्त एमआयएमचा चिथावणीखोर नेता अकबरुद्दीन ओवैसी औरंगाबादेत आला होता. आधी एका दर्ग्याला भेट दिली. त्यानंतर आजी खासदार जलील आणि माजी आमदार वारिस पठाण दोघांसोबत अकबरुद्दीन औरंगजेबाच्या समाधीवर गेला. आधी अकबरुद्दीननं फुल वाहिली, नंतर खासदार जलील महोदयांनी. नंतर वारिस पठाणांनी. देशातल्या सर्व पक्षांपेक्षा आम्ही किती सेक्यूलर आहोत, यावर जलील आणि असदुद्दीन औवैसी सभा गाजवतात. मात्र जेव्हा आपण आपल्याच विधानांवर खोटे पडल्याचं उघड होतं, तेव्हा त्याला सावरताना मात्र त्यांना धडपड करावी लागते.

सध्या एमआयएमची धूर्त स्ट्रॅटेजी मुरलेल्या पक्षालाही लाजवणारी आहे. जेव्हा भोंग्याविरोधात राज ठाकरे आंदोलन पुकारतात, तेव्हा एमआयएम मौन राहते. मात्र जेव्हा औरंगाबादेत राज ठाकरेंची सभा होते, तेव्हा ओवैसी अचानक हैद्राबादेतून औरंगाबादेत प्रकट होतात. एकीकडे असदुद्दीनं औवेसी शिवसेना-भाजप एकच आहे असं म्हणतात, आणि दुसरीकडे त्यांचा खासदार शिवसेनेला युतीचा प्रस्ताव पाठवतो. मोठा भाऊ सेक्युलरिझमचा बुरखा चढवून जात-धर्म सदभावनेच्या गप्पा करतो… दुसरीकडे धाकटा भाऊ सभांमधून कट्टरतेचं विष पेरतो. असदुद्दीन औवैसी दर एका मिनिटाला राज्यघटनेचे दाखले देतात., आणि धाकटा भाऊ अकबरुद्दीन १५ मिनिटात शंभर कोटी जनतेला संपवण्याची धमकी देतो.

एकीकडे असदुद्दीन ओवैसी मुस्लिम तरुणांना तलवारीऐवजी पेन हातात घेण्याचं आवाहन करतात, दुसरीकडे त्यांचाच लहान भाऊ मुस्लिम तरुणांची माथी भडकवतो. राम मंदिर आणि ट्रिपल तलाकचा निकालावरुन असदुददीन ओवैसी कोर्टाच्या निर्णयावर खंत व्यक्त करतात..
मात्र जेव्हा त्यांचा भावाची वादग्रस्त विधानांची केस कोर्टात असते, तेव्हा कोर्टाचा अनादर नको म्हणून तोंडावर बोट ठेवतात. एकीकडे औरंगाबादचे खासदार छत्रपती संभाजीराजेंच्या बलिदानाला मानतात, दुसरीकडे ज्या औरंगजेबानं हाल-हाल करुन संभाजीराजेंना मारलं, त्याच्या समाधीवर दोन-दोन वेळा फुलंही वाहतात. जवळपास पूर्ण राज्यघटना असदुद्दीन ओवैसींची तोंडपाठ आहे. भारतीयांच्या धर्मनिरपक्षतेवर त्यांना दांगडा विश्वासही आहे. मात्र ज्या औरंगजेबानं असंख्य मंदिरं पाडली, ज्या औरंगजेबानं सत्तेसाठी बापाला डांबलं, भावाची मुंडकं छाटून हत्या केली ज्या औरंगजेबाविरोधात महाराष्ट्रातल्या ३ पिढ्या लढल्या. त्याच औरंगजेबाच्या कबरीपुढे त्यांच्याच पक्षांचे नेते गुडघेही टेकतात.