Special Report : चुकून जिंकलेल्या खासदाराला अधिकार काय?, चंद्रकांत खैरेंचा खोचक सवाल, इम्तियाज जलील यांच्या टीकेला प्रत्युत्तर

| Updated on: Feb 01, 2022 | 10:15 PM

सरकारच्या या वाईन धोरणावर भाजप नेत्यांसह AIMIM चे नेते आणि खासदार इम्तियाज जलील यांनीही जोरदार टीका केलीय. इतकंच नाही तर सरकारच्या या निर्णयानंतर औरंगाबादेत ज्या दुकानात पहिल्यांदा वाईन येईल, ते दुकान मी स्वत: फोडणार असा इशाराच जलील यांनी दिलाय. जलील यांच्या या इशाऱ्यानंतर आता माजी खासदार आणि शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. जलील हे औरंगाबादेत वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. जलील हे हैदराबादी रझाकार आहेत. त्यांच्यावर गृह विभाग आणि पोलिसांनी कारवाई केली पाहिजे, अशी मागणी चंद्रकांत खैरे यांनी केलीय.

Follow us on

राज्यात आता किराणा दुकान आणि सुपरमार्केटमध्येही वाईन विक्री करता येणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नुकताच हा निर्णय घेण्यात आलाय. त्यानंतर सरकारच्या या वाईन धोरणावर भाजप नेत्यांसह AIMIM चे नेते आणि खासदार इम्तियाज जलील यांनीही जोरदार टीका केलीय. इतकंच नाही तर सरकारच्या या निर्णयानंतर औरंगाबादेत ज्या दुकानात पहिल्यांदा वाईन येईल, ते दुकान मी स्वत: फोडणार असा इशाराच जलील यांनी दिलाय. जलील यांच्या या इशाऱ्यानंतर आता माजी खासदार आणि शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. जलील हे औरंगाबादेत वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. जलील हे हैदराबादी रझाकार आहेत. त्यांच्यावर गृह विभाग आणि पोलिसांनी कारवाई केली पाहिजे, अशी मागणी चंद्रकांत खैरे यांनी केलीय.

इम्तियाज जलील यांचा इशारा काय होता?

महाराष्ट्र सरकारने मंजुर केलेल्या नव्या वाईन विक्रीच्या धोरणाला खासदार इम्तियाज जलील यांनी तीव्र शब्दात विरोध केला आहे. तसेच यावेळी त्यांनी केवळ टीका न करता सरकारला इशारा दिला आहे. ते म्हणाले, सरकारच्या या नियमानुसार, ज्या दुकानात आधी वाईन येईल, ते दुकानच आम्ही फोडणार. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्य मंत्री अजित पवार यांच्यासमोर मी ही कृती करणार. शेतकऱ्यांसाठी हा निर्णय घेतालाय, असं समर्थन सरकारच्या वतीने करण्यात येतंय. मग चरस आणि गांजाही शेतातच येतात. त्यालाची परवानगी द्या, अशी संतप्त प्रतिक्रिया खासदार जलील यांनी व्यक्त केली होती.