Special Report | उद्या मुश्रीफांचा तिसरा घोटाळा उघड करणार, सोमय्यांचा दावा

Special Report | उद्या मुश्रीफांचा तिसरा घोटाळा उघड करणार, सोमय्यांचा दावा

| Edited By: | Updated on: Sep 27, 2021 | 9:29 PM

सोमय्या यांनी उद्या हसन मुश्रीफ यांचा तिसरा घोटाळा समोर आणणार असल्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे. सुरुवातीला किरीट सोमय्या यांनी हसन मुश्रीफ आणि त्यांच्या मुलावर 127 कोटीच्या आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप केला होता. त्यानंतर आप्पासाहेब नलावडे साखर कारखान्यात घोटाळ्याचा पैसा वळवल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. त्यानंतर आता सोमय्या उद्या मुश्रीफांवर कोणता आरोप करतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यासाठी भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या आज पुन्हा एकदा कोल्हापूर दौऱ्यावर निघाले आहेत. त्यापूर्वी त्यांना मुंबईतील सिद्धीविनायक मंदिराच्या बाहेरुनच सिद्धीविनायकाचं दर्शन घेतलं. त्यावेळी किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पुन्हा एकदा आव्हान दिलंय. आता शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनाच मी नोटीस दिली की हिम्मत असेल तर मला रोखून दाखवा, अशा शब्दात सोमय्या यांनी पवार आणि ठाकरेंना एकप्रकारे चॅलेंज केलं आहे.

तर दुसरीकडे सोमय्या यांनी उद्या हसन मुश्रीफ यांचा तिसरा घोटाळा समोर आणणार असल्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे. सुरुवातीला किरीट सोमय्या यांनी हसन मुश्रीफ आणि त्यांच्या मुलावर 127 कोटीच्या आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप केला होता. त्यानंतर आप्पासाहेब नलावडे साखर कारखान्यात घोटाळ्याचा पैसा वळवल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. त्यानंतर आता सोमय्या उद्या मुश्रीफांवर कोणता आरोप करतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

दरम्यान हसन मुश्रीफ मला या ना त्या प्रकारे थांबवण्याचा पयत्न करणार. उद्या मुश्रीफ यांच्या तिसऱ्या आणि चौथ्या घोटाळ्याचीही तक्रार करणार, असा इशाराच सोमय्या यांनी दिलाय. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडून यांनी केवळ लुटा हेच शिकलं आहे. मी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना आव्हान देतो की हिम्मत असेल तर मला थांबवा. पोलिसांचा गुंडांसारखा वापर केला. आता ते थांबवू शकणार नाहीत. हसन मुश्रीफ यांना तुरुंगात जाण्यापासून कुणीही थांबवू शकणार नाहीत. हसन मुश्रीफ यांना कुणीही वाचवू शकणार नाही, असा दावाही सोमय्या यांनी यावेळी केलाय.