Special Report | ईडीनंतर नवाब मलिक यांच्या मागे NIA लागणार ?

Special Report | ईडीनंतर नवाब मलिक यांच्या मागे NIA लागणार ?

| Edited By: | Updated on: Feb 24, 2022 | 10:25 PM

किरीट सोमय्या यांनी शरद पवार, उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारवरही निशाणा साधलाय. दरम्यान, मलिकांच्या प्रकरणात आता एनआयए देखील चौकशी करण्याची शक्यता किरीट सोमय्या यांनी व्यक्त केलीय. संपूर्ण राज्यभरात नवाब मलिकांचा राजीनाम्या घ्या पूर्ण भाजपकडून आंदोलन करण्यात येतंय. तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून भाजप सूडाचं राजकारण करत असल्याचा आरोप करत निषेध आंदोलन करण्यात आलंय.

अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना ईडीनं अटक केल्यानंतर राज्यात पुन्हा एकदा सत्ताधारी आणि विरोधक असा संघर्ष पेटलाय. केंद्राकडून तपास यंत्रणाचा गैरवापर सुरु असल्याचा आरोप एकीकडे महाविकास आघाडीमधील नेते करत आहेत, तर दुसरीडे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दोघे गेले अजून दहा जण रांगेत आहेत, असं म्हटलंय. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी डर्टी डझन रांगेत आहेत, असं विधान केलं आहे. दरम्यान, एका पत्रकाराशी बोलत असताना त्यांनी हे विधान केल्याचं म्हटलंय. अनिल देशमुख, नवाब मलिक यांच्यानंतर आणखी बारा जण आहेत, जे जेलमध्ये जातील, असं किरीट सोमय्यांनी म्हटलंय. यावेळी किरीट सोमय्या यांनी शरद पवार, उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारवरही निशाणा साधलाय. दरम्यान, मलिकांच्या प्रकरणात आता एनआयए देखील चौकशी करण्याची शक्यता किरीट सोमय्या यांनी व्यक्त केलीय. संपूर्ण राज्यभरात नवाब मलिकांचा राजीनाम्या घ्या पूर्ण भाजपकडून आंदोलन करण्यात येतंय. तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून भाजप सूडाचं राजकारण करत असल्याचा आरोप करत निषेध आंदोलन करण्यात आलंय.