Special Report | महाविकास आघाडीचे नेतेही नितीन गडकरीचे ‘फॅन’!

| Updated on: Sep 24, 2021 | 9:37 PM

नितीन गडकरी यांच्या कार्यशैलीचे चाहते केवळ भाजपमध्येच नाही तर विरोधी पक्षातही आहेत. त्याचाच प्रत्यय आज पुण्यातील कार्यक्रमात आला. उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्यासह उपस्थित सर्वच नेत्यांनी आज नितीन गडकरी यांचं तोडंभरुन कौतुक केली. त्यावेळी गडकरी यांनीही पुण्यासाठी रिंगरोडबाबत महत्वाची घोषणा केलीय.

Follow us on

पुण्यात (Pune) आज सिंहगड रोडवरील उड्डाणपुलाचं (Singhgad ) भूमीपूजन उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या हस्ते झालं. यावेळी नितीन गडकरी यांनी देशभरात सुरु असलेल्या विविध विकासकामांची यादीच वाचून दाखवली. मी दिल्लीत महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करतो, त्यामुळे महाराष्ट्राच्या विकासासाठी कटिबद्ध आहे असं नितीन गडकरी यांनी सांगितलं. उड्डाणपुलाचं उद्घाटन करताना नितीन गडकरी म्हणाले, मुंबईतील वरळी- बांद्रा सी लिंकशी इमोशनल नातं आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्त्वात या पुलाची जबाबदारी मला मिळाली. मला खूप शिकायला मिळालं. सी लिंक वसई -विरारपर्यंत न्यायचा माझी इच्छा होती. पण महाराष्ट्राच्या आर्थिक स्थितीमुळे झालं नाही, असं नितीन गडकरी म्हणाले.

दरम्यान, नितीन गडकरी यांच्या कार्यशैलीचे चाहते केवळ भाजपमध्येच नाही तर विरोधी पक्षातही आहेत. त्याचाच प्रत्यय आज पुण्यातील कार्यक्रमात आला. उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्यासह उपस्थित सर्वच नेत्यांनी आज नितीन गडकरी यांचं तोडंभरुन कौतुक केली. त्यावेळी गडकरी यांनीही पुण्यासाठी रिंगरोडबाबत महत्वाची घोषणा केलीय.