Special Report | महाराष्ट्रात अतिवृष्टीच्या दुर्घटनांमध्ये कुठे काय घडलं?

| Updated on: Jul 23, 2021 | 9:42 PM

कोकणात कहर केल्यानंतर आता महापुराचं तांडव कोल्हापूर, सांगली या पट्ट्यात ट्रेलर दाखवू लागलं आहे.

Follow us on

कोकणात कहर केल्यानंतर आता महापुराचं तांडव कोल्हापूर, सांगली या पट्ट्यात ट्रेलर दाखवू लागलं आहे. कोकणात ढिगाऱ्याखालून लोकांना बाहेर काढण्याचं काम सुरु आहे. तर कोल्हापुरात पाण्याच्या वेढ्यातून लोकांना सोडवलं जातंय. मुसळधार पावसामुळे महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये भीषण परिस्थिती आहे. मुसळधार पावसामुळे महाराष्ट्रात दोन दिवसात तब्बल दहा ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. रत्नागिरी, रायगड आणि सातारा जिल्ह्यात दरड कोसळून 50 पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यात महाडच्या तळीये गाव, साताऱ्यातील आंबेघर गावात, तर रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणच्या पोसरे-बौद्धवाडी आणि खेडच्या धामणंदमध्ये दरड कोसळून अनेक घरं गाडली गेली आहेत. 3 जिल्ह्यातील या दुर्दैवी घटनांमुळे महाराष्ट्रावर भीषण संकट ओढावल्याचं दिसून येत आहे. महाराष्ट्रातील या घडामोडींची सविस्तर माहिती सांगणारा ‘टीव्ही 9 मराठी’चा स्पेशल रिपोर्ट !