Special Report : आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचा पुणे दौरा सोशल मीडियात चर्चेचा विषय का बनला?

Special Report : आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचा पुणे दौरा सोशल मीडियात चर्चेचा विषय का बनला?

| Edited By: | Updated on: Aug 28, 2022 | 7:36 AM

Tanaji Sawant : या दौऱ्यात नेमकं असं काय आहे, आणि विरोधक त्यावर टीका का करु लागले आहेत, असा प्रश्न उपस्थित होणं स्वाभाविक आहे. शनिवारी दिवसभर सोशल मीडियात आरोग्यमंत्री तानाजी सावंतांचा दौऱ्यावर कल्ला रंगला.

मुंबई : महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री तानाजी सावंतांचा (Tanaji Sawant) पुणे (Pune) दौरा सोशल मीडियात (Social Media Memes) चेष्ठेचा विषय बनलाय. 3 दिवस आरोग्यासारखं महत्वाचं खातं सांभाळणाऱ्या तानाजी सावंतांचा घर ते खासगी ऑफिस आणि पुन्हा खासगी ऑफिस ते घर असा दौरा आहे. या दौऱ्यात नेमकं असं काय आहे, आणि विरोधक त्यावर टीका का करु लागले आहेत, असा प्रश्न उपस्थित होणं स्वाभाविक आहे. शनिवारी दिवसभर सोशल मीडियात आरोग्यमंत्री तानाजी सावंतांचा दौऱ्यावर कल्ला रंगला. नेमक्या या दौऱ्यात असं काय आहे, ज्यावरुन सोशल मीडियात याच दौऱ्यावरुन मिम्स तयार झाले? आरोग्यमंत्री तानाजी सावंत अधिवेशनानंतर पुण्यात गेले. त्यानंतरच्या त्यांच्या ३ दिवसांच्या दौऱ्यात नेमकं काय आहे? हा दौरा नेमका का चर्चेत राहिला? पाहूयात त्याचाच आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट…