Special Report | नियमानं कंत्राट मिळवलं, किरीट सोमय्या यांचे आरोप चहावाले राजीव साळुंखेंंनी फेटाळले

| Updated on: Feb 12, 2022 | 8:59 PM

सोमय्या केवळ आरोप करून थांबले नाहीत, तर त्यांनी परळ येथील या चहावाल्याच्या हॉटेलात जाऊनही पाहणी केली. त्यानंतर टीव्ही9 मराठीच्या टीमने सर्वात आधी या चहावाल्याला शोधून काढले. राजीव साळुंखे  यांनी सर्वात आधी ‘टीव्ही 9 मराठी’ला फोनो दिला. त्यात त्यांनी सोमय्यांचे सर्व आरोप फेटाळून लावले.

Follow us on

पुण्यातील कोव्हीड सेंटरचं कंत्राट एका चहावाल्याला महाविकास आघाडीने दिल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. राजीव साळुंखे नावाच्या चहावाल्यावर सोमय्या यांनी हे आरोप केले होते. त्यानंतर हा चहावाला अचानक चर्चेत आला. सोमय्या केवळ आरोप करून थांबले नाहीत, तर त्यांनी परळ येथील या चहावाल्याच्या हॉटेलात जाऊनही पाहणी केली. त्यानंतर टीव्ही9 मराठीच्या टीमने सर्वात आधी या चहावाल्याला शोधून काढले. राजीव साळुंखे  यांनी सर्वात आधी ‘टीव्ही 9 मराठी’ला फोनो दिला. त्यात त्यांनी सोमय्यांचे सर्व आरोप फेटाळून लावले. या देशाचा पंतप्रधान एक चहावाला होऊ शकतो. मी तर बिझनेस मन आहे. मी कोव्हिड सेंटर का चालवू शकत नाही? असा रोखठोक सवाल राजीव साळुंखे यांनी सोमय्यांना केला आहे.

काल मी किरीट सोमय्यांची बाईट पाहिली आहे. त्यांच्या सर्व प्रश्नांना मी उत्तरे देणार आहे. सध्या मी वकिलासोबत बसलो आहे. सर्व उत्तरे देईन. जे आहे ते आहे. आम्ही काही चोरी केली नाही. रितसर सरकारच्या नियमानुसार आम्ही टेंडर मिळवलं आहे. त्यांना कुठून खोटी माहिती मिळाली माहीत नाही, असं राजीव साळुंखे म्हणाले.