Special Report | शिवसैनिकांच्या दहशतीमुळं वाशिममध्ये रस्त्याची कामं बंद पडलीत!

Special Report | शिवसैनिकांच्या दहशतीमुळं वाशिममध्ये रस्त्याची कामं बंद पडलीत!

| Edited By: | Updated on: Aug 14, 2021 | 8:45 PM

राष्ट्रीय महामार्गाच्या कामात शिवसेनेच्या स्थानिक लोकप्रतिनिधींचा हस्तेक्षप वाढल्याने गेल्या काही महिन्यांपासून कामं रखडली असल्याचा आरोप पत्राच्या माध्यमातून नितीन गडकरी यांनी केला आहे. तसंच जर असेच प्रकार चालत राहिले तर महाराष्ट्रातील राष्ट्रीय महामार्गाच्या कामांना मंजुरी देण्याच्या संदर्भात आमच्या मंत्रालयाला विचार करावा लागेल, असा गर्भित इशारा देताना यामुळे महाराष्ट्राचे आणि जनतेचे नुकसान होईल, अशी भीतीही गडकरींनी व्यक्त केली आहे.

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना अतिशय स्फोटक पत्र लिहिलं आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या कामात शिवसेनेच्या स्थानिक लोकप्रतिनिधींचा हस्तेक्षप वाढल्याने गेल्या काही महिन्यांपासून कामं रखडली असल्याचा आरोप पत्राच्या माध्यमातून नितीन गडकरी यांनी केला आहे. तसंच जर असेच प्रकार चालत राहिले तर महाराष्ट्रातील राष्ट्रीय महामार्गाच्या कामांना मंजुरी देण्याच्या संदर्भात आमच्या मंत्रालयाला विचार करावा लागेल, असा गर्भित इशारा देताना यामुळे महाराष्ट्राचे आणि जनतेचे नुकसान होईल, अशी भीतीही गडकरींनी व्यक्त केली आहे. गडकरींनी स्फोटक पत्रातून मुख्यमंत्र्यांना एकाचवेळी गर्भित इशारा आणि भावनिक सादही घातल्याचं दिसून येत आहे.

Published on: Aug 14, 2021 08:45 PM