Special Report | Vladimir Putin युद्धाच्या मूडमध्ये आहेत का? -Tv9
रशिया आणि यूक्रेनमधील युद्धानं आता भीषण स्वरुप धारण केलं आहे. रशियानं यूक्रेनवर केलेल्या हल्ल्यामुळे अनेक देशांनी रशियाविरोधात प्रतिबंध लादायला सुरुवात केलीय. या प्रतिबंधांमुळे संतापलेल्या आणि चिंतित असलेल्या ब्लादिमीर पुतिन यांनी विरोधकांना उत्तर देण्यासाठी मोठी कारवाई केलीय.
नवी दिल्ली : रशिया आणि यूक्रेनमधील युद्धानं आता भीषण स्वरुप धारण केलं आहे. रशियानं यूक्रेनवर केलेल्या हल्ल्यामुळे अनेक देशांनी रशियाविरोधात प्रतिबंध लादायला सुरुवात केलीय. या प्रतिबंधांमुळे संतापलेल्या आणि चिंतित असलेल्या ब्लादिमीर पुतिन यांनी विरोधकांना उत्तर देण्यासाठी मोठी कारवाई केलीय. पुतिन यांनी 35 देशांसाठी आपली हवाई हद्द बंद केलीय. मिळालेल्या माहितीनुसार रशियानं ब्रिटन आणि जर्मनीसह 35 देशांसाठी आपली हवाई हद्द बंदी केली आहे. तर विविध रिपोर्टनुसार रशियाचे राष्ट्रपती पुतिन यांनी उच्चस्तरिय बैठक घेतली. यात रशियाचे संरक्षणमंत्री आणि तिन्ही सैन्यदलाचे प्रमुख उपस्थित होते. ही बैठकीत पुतिन यांचे कार्यालय क्रेमलिनमध्ये पार पडली. दुसरीकडे फ्रान्सने रशियाचे सर्व खाते फ्रीज करत रशियाची आर्थिक कोंडी करण्याचा प्रयत्न केलाय. तर अमेरिकी वित्त विभागानंही रशियाची केंद्रीय बँक आणि सरकारी गुंतवणूक कोषावर नवे प्रतिबंध लादले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार जर्मनी, फ्रान्स, ब्रिटन, इटली, जापान, युरोपीय संघ आणि अन्य देश अमेरिकेसोबत मिळून निर्बंधांद्वारे रशियाच्या केंद्रीय बँकेला निशाणा करत आहेत. या देशांनी हे पाऊल यूक्रेन आणि रशियामधील युद्धाच्या पार्श्वभूमीवर घेतलं आहे.
