Special Report | चैत्यभूमीवर एनसीबी अधिकारी समीर वानखेडेंना विरोध !

| Updated on: Dec 06, 2021 | 11:07 PM

चैत्यभूमीवर समीर वानखेडेंना विरोध करण्यात आल्याचं पहायला मिळालं. तसेच वानखेडेंच्या विरोधकांकडून घोषणाबाजीही करण्यात आली. मंत्री नवाब मलिक समीर वानखेडेंना मुस्लिम सांगून, त्यांच्या जात प्रमाणपत्राविरोधात कोर्टात लढत आहेत. तर इकडे समीर वानखेडेंना चैत्यभूमीवर विरोधाचा सामना करावा लागला. महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी समीर वानखेडे येताच, त्यांच्याविरोधात भीमशक्ती रिपब्लिकन सेनेचे कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली.

Follow us on

वानखेडे विरोधक आणि समर्थक यांच्यात हमरीतुमरी झाल्यानं काही काळ तणाव निर्माण झाला. मात्र विरोधकाकडे दुर्लक्ष करत, समीर वानखेडेंनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलं. विशेष म्हणजे यानंतर समीर वानखेडेंनी वंचित आघाडी प्रमुख प्रकाश आंबेडकरांची भेट घेतली. यावेळी काही वेळ वानखेडे आणि आंबेडकरांनी जवळच बसून चर्चा केली. मात्र या दोघांची नेमकी काय चर्चा झाली हे समोर येऊ शकलेलं नाही. तर चैत्यभूमीवर येऊन ऊर्जा मिळते, त्यामुळं आपण इथं आल्याचं समीर वानखेडेंनी म्हटलंय.