Special Report | महिलेचा जबाब, संजय राठोडांचं काय होणार?
एका महिलेने घाटंजी पोलिसाना स्पिड पोस्टद्वारे पाठवली. दरम्यान पत्रावरील पत्यावर घाटंजी पोलिसाची एक टीम त्या महिलेच्या गावाला आले होते. त्या गावात महिलेच्या घरी मात्र महिलेच्या घरचे कोणीच नाही शिवाय महिला ही इथे नसल्याने पोलीस पथक आल्या पावली ठाण्यात परत गेले होते. मात्र, आज संबंधित महिला आणि तिच्या परिवारानं एसआयटीकडे आपला जबाब नोंदवला आहे. त्यामुळे आत लवकरच संजय राठोड यांची चौकशी होणार आहे.
माजी मंत्री संजय राठोड यांनी शरीर सुखाची मागणी केली अशा आशयाची तक्रार एका महिलेने घाटंजी पोलिसाना स्पिड पोस्टद्वारे पाठवली. दरम्यान पत्रावरील पत्यावर घाटंजी पोलिसाची एक टीम त्या महिलेच्या गावाला आले होते. त्या गावात महिलेच्या घरी मात्र महिलेच्या घरचे कोणीच नाही शिवाय महिला ही इथे नसल्याने पोलीस पथक आल्या पावली ठाण्यात परत गेले होते. मात्र, आज संबंधित महिला आणि तिच्या परिवारानं एसआयटीकडे आपला जबाब नोंदवला आहे. त्यामुळे आत लवकरच संजय राठोड यांची चौकशी होणार आहे. दरम्यान, यवतमाळच्या या महिलेनं केलेले आरोप संजय राठोड यांनी फेटाळले आहेत.
