Special Report | शरद पवार, ब्राम्हण आणि ‘ते’ 7 वाद-TV9

| Updated on: May 21, 2022 | 10:44 PM

याआधी शरद पवारांच्या घेतलेल्या अनेक भूमिकांवरुन काही ब्राह्मण संघटनांनी त्याला विरोध केला. त्यात सध्या केतकी चितळेची फेसबूक पोस्ट आणि राज ठाकरेंनी केलेल्या आरोपांनी त्या वादाला पुन्हा उजळणी मिळालीय. पवारांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीत पहिल्यांदा कोणत्यातरी जातीच्या संघटनांना बैठकीसाठी बोलावलंय.

Follow us on

याआधी शरद पवारांच्या घेतलेल्या अनेक भूमिकांवरुन काही ब्राह्मण संघटनांनी त्याला विरोध केला. त्यात सध्या केतकी चितळेची फेसबूक पोस्ट आणि राज ठाकरेंनी केलेल्या आरोपांनी त्या वादाला पुन्हा उजळणी मिळालीय. पवारांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीत पहिल्यांदा कोणत्यातरी जातीच्या संघटनांना बैठकीसाठी बोलावलंय. सध्या सुरु असलेले वाद आणि काही दिवसांपूर्वी छगन भुजबळ आणि अमोल मिटकरींनी केलेली विधानं सुद्धा या बैठकीत महत्वाचे ठरणार आहेत…एकूण २२ ब्राह्णण संघटनांना आमंत्रण दिलं गेलं होतं, त्यापैकी अखिल भारतीय
ब्राह्णण महासंघानं आमंत्रण नाकारलं… आधी पवारांनी मिटकरींच्या विधानावर स्पष्टीकरण द्यावं, त्यानंतर बैठकीवर बोलू, असं ब्राह्णण महासभेनं म्हटलंय. शरद पवार आणि काही ब्राह्णण संघटना यांच्यातल्या मतभेदांची कहाणी फार जुनी आहे…. एकूण ७ मुद्दे असे आहेत, ज्यावरुन
शरद पवार आणि ब्राह्णण संघटना आमने-सामने आल्या.

त्यापैकी एक कारण आहे समर्थ रामदास स्वामी, दुसरं कारण आहे याआधी लालमहालात असलेला दादोजी कोंडदेवांचा पुतळा, तिसरं कारण आहे पुणेरी पगडी, चौथं कारण राम गणेश गडकरींचा पुतळा, पाचवं कारण गोब्राह्णणप्रतिपालक वरुन पवारांनी केलेलं विधान, सहावं कारण आहे संभाजीराजेंच्या नियुक्तीवेळी शरद पवारांनी केलेली टीप्पणी, आणि सातवं कारण आहे नुकतंच अमोल मिटकरींनी केलेलं विधान. काही वर्षांपूर्वी पुण्यातल्या एका राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात छगन भुजबळांना पुणेरी पगडी घातली गेली. त्यावर पवारांनी स्वतः यापुढे राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात पुणेरी पगडी नको, तर फक्त फुल्यांचीच पगडी असेल, असं जाहीर केलं आणि नंतर स्वतः पवारांनीच भुजबळांना फुले पगडी घातली.

जिला पुणेरी पगडी म्हटली जातं, ती प्रामुख्यानं पेशव्यांच्या काळात प्रचलित झाली…
त्यानंतर लोकमान्य टिळक, न्यायमूर्ती रानडे हे सुद्धा पुणेरी पगडी वापरत होते.. असं म्हटलं जातं की त्याकाळात पुणेरी पगडी कुणी घालावी, यावरही काही बंधनं होती., म्हणून पवारांनी ती पगडी नाकारल्याचा दावा होतो. पवारांनी पुणेरी पगडीऐवजी फक्त फुले पगडी वापरण्याच्या सूचना तर दिल्या, मात्र नंतर एका दुसऱ्या कार्यक्रमात खुद्द पवारांनाच पुणेरी पगडी घातली…. नंतर पगड्यांवरुन पवारांनी एका कार्यक्रमात भूमिका स्पष्ट केली. छत्रपती शिवाजी महाराजांना गोब्राह्णणप्रतिपालक ही उपाधी का लावली गेली, असाही प्रश्न शरद पवारांनी उपस्थित केला. त्यासाठी त्यांनी काही ऐतिहासिक दाखलेही दिले होते…त्यांच्या या विधानाचीही बरीच चर्चा झाली.

दुसरा महत्वाचा वाद म्हणजे शिवाजी महाराज आणि अफजलखानाचा वध… अफजलखानाच्या वधावरुन नेहमी शिवाजी महाराजांची मुस्लिमविरोधी प्रतिमा रंगवली जाते., असं पवारांनी अनेकदा म्हटलंय…त्यावर काही दिवसांपूर्वी राज ठाकरेंनी टीका केली होती. सलग ३ सभेत राज ठाकरेंनी पवारांवर जातीयतेचा आरोप केलाय आणि पवारांनी पहिल्यांदा एखाद्या समाजाला बैठकीसाठी बोलावलंय. आणि पुणे महापालिकेची निवडणूकही तोंडावर आहे.